Big Breking : पाकिस्तानात मोठा विमान अपघात : कराची विमानतळावर विमान कोसळले

टीम ई-सकाळ
Friday, 22 May 2020

विमानात 100 प्रवासी होते. आतापर्यंत मिळालेल्या अपडेट्सनुसार जीवितहानीविषयी कोणतिही माहिती हाती आलेली नाही.

कराची : पाकिस्ताना कराची विमानतळावजवळ प्रवासी विमान कोसळून मोठा अपघात झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान कोसळून हा अपघात झाला असून, त्या विमाना 100 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे. 

 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

या संदर्भात आतापर्यंत मिळालेली माहिती अशी, लाहोरहून कराचीला निघालेले विमान, कराची विमानतळाजवळ कोसळले आहे. विमानात 100 प्रवासी होते. आतापर्यंत मिळालेल्या अपडेट्सनुसार जीवितहानीविषयी कोणतिही माहिती हाती आलेली नाही. पाकिस्तानातील डॉन या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार विमानात 90 प्रवासी आणि आठ क्रू मेंबर होती. अपघातानंतर कराचीमधील सर्व रुग्णलयांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून, विमानतळ परिसरातील सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

आणखी वाचा - इटलीचा आलेख जगासाठी दिलासादायक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pia plane crash near karachi airport pakistan