पायलटच्या फोनच्या मदतीने सापडलं 'त्या' कोसळलेल्या विमानाचं लोकेशन

Tara Air Aircraft, Nepal
Tara Air Aircraft, Nepalesakal

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये आज क्रॅश झालेले विमान पायलटच्या फोनचे GPS लोकेशन वापरून ट्रॅक डाउन करण्यात आले, असे स्थानिक माध्यमांनी विमानतळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. हे २२ प्रवासी असलेले विमान कॅप्टन प्रभाकर घिमिरे उडवत होते. दरम्यान या विमानात चार भारतीय नागरिक देखील प्रवास करत होते.

काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महाव्यवस्थापक प्रेम नाथ ठाकूर यांनी सांगितले की, "बेपत्ता विमानातील कॅप्टन घिमिरे यांचा मोबाईल रिंग होत आहे आणि नेपाळ टेलिकॉमवरून कॅप्टनचा फोन ट्रॅक केल्यानंतर नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर संभाव्य अपघाताच्या ठिकाणी उतरले आहे." नेपाळच्या MyRepublica न्यूज पोर्टलने हे वृत्त दिले आहे. पोखरा या शहरातून जोमसोमसाठी उड्डाण केल्यानंतर पहाटे डोंगराळ प्रदेशात विमान बेपत्ता झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान नेपाळच्या तारा एअरच्या ट्विन ऑटर 9N-AET विमानाने उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांनी कंट्रोल टॉवरशी त्याचा संपर्क तुटला, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले.

प्रवाशांमध्ये चार भारतीय नागरिक, दोन जर्मन, १३ नेपाळी प्रवासी आणि तीन नेपाळी कर्मचारी आहेत, असे एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारटौला यांनी सांगितले. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी या चार भारतीयांची नावे आहेत.

Tara Air Aircraft, Nepal
नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची माहिती

"तारा एअरचे फ्लाइट 9NAET जे आज सकाळी ९.५५ वाजता पोखरा येथून ४ भारतीयांसह २२ लोकांना घेऊन बेपत्ता झाले आहे. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. दूतावास त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आमचा आपत्कालीन हॉटलाइन नंबर: +977 -9851107021," नेपाळमधील भारतीय दूतावासाने ट्विट केले.

10 सैनिक आणि नागरी उड्डयन प्राधिकरणाचे दोन कर्मचारी असलेले नेपाळ आर्मीचे हेलिकॉप्टर अपघाताची संभाव्य जागा असलेल्या नरशांग मॉनेस्ट्रीच्या जवळ नदीच्या काठावर उतरले आहे, ठाकूर यांनी माहिती दिलीचे वृत्त माय रिपब्लिकाने दिले आहे. आम्ही लष्कर आणि पोलि‍सांना शोध घेण्यासाठी पायी पाठवले आहे, असे देखील ठाकूर यांनी सांगितले आहे.

Tara Air Aircraft, Nepal
नेपाळमध्ये विमान बेपत्ता; भारतीय दुतावासाकडून हॉटलाईन नंबर जाहीर

म्याग्दीचे मुख्य जिल्हा अधिकारी चिरंजीबी राणा यांनी काठमांडू पोस्टला सांगितले की, खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. घटनास्थळी पोलिसांचे एक पथक पाठवण्यात आले आहे. ज्या भागात स्थानिकांनी विमानाला शेवटचे पाहिले होते, तेथे मानवी वस्ती नाही. हवामानात सुधारणा होताच हेलिकॉप्टर हवाई कारवाईला सुरुवात करेल, असे राणा यांनी सांगितले. दरम्यान नेपाळचे गृहमंत्री बाल कृष्ण खांड यांनी अधिकाऱ्यांना शोध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com