piyush goyal
sakal
बर्लिन - जर्मनीतील संशोधनाची खोली आणि भारतातील प्रतिभा, उत्पादनक्षमता व मोठी बाजारपेठ यांची सांगड घालून प्रयोगशाळेत विकसित होणारे तंत्रज्ञान थेट उद्योगाच्या उत्पादन रेषेपर्यंत नेण्यासाठी भारत-जर्मनी भागीदारीचा नवा आराखडा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी मांडला.
त्यासाठी त्यांनी चार कलमी कार्यक्रम सुचविला असून, संशोधनाचे औद्योगिक उत्पादनात रूपांतर, भविष्यातील तंत्रज्ञानासाठी संयुक्त केंद्रे, पुनर्वापराधारित उत्पादन आणि उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्य विकास यावर त्यांनी भर दिला.