Piyush Goyal
sakal
द हेग (नेदरलॅंड्स) - सात दशकांपूर्वी समुद्र नेदरलॅंड्सच्या उंबरठ्यावर आला होता. डच लोकांनी समुद्राच्या दयेची वाट पाहिली नाही. त्यांनी डेल्टा वर्क्सचे बांध आणि संरक्षक कवचे उभी केली आणि निसर्गाला शब्दशः शिस्त लावली. याच कथेचा धागा पकडून केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी द हेगमधील व्यासपीठावरून भारताचे विकासचित्र रंगविले आणि नेदरलॅंड्सच्या उद्योगविश्वाला सरळ प्रस्ताव दिला: 'भारतासोबत या.'