नॅन्सी पेलोसींच्या विमानाकडं सर्वांचं लक्ष! ठरलं जगातील सर्वाधिक ट्रॅक झालेलं विमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nancy peloci

नॅन्सी पेलोसींच्या विमानाकडं सर्वांचं लक्ष! ठरलं जगातील सर्वाधिक ट्रॅक झालेलं विमान

नवी दिल्ली : चीन आणि अमेरिका या जगातील दोन महाशक्ती युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकल्याचं सध्या चित्र आहे. याला कारणीभूत ठरलाय तैवान हा देश. या तैवानच्या भेटीचा दौरा अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसींनी जाहीर केल्यानं चीननं आक्रमक भूमिका घेत थेट युद्धाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर पेलोसी ज्या विमानातून तैवानमध्ये पोहोचल्या आहेत. त्या विमानाला जगातील सर्वाधिक लोकांनी ट्रॅक केलं आहे. (Plane carrying Nancy Pelosi becomes world most tracked flight)

अमेरिकेच्या हवाई दलाचं बोईंग सी ४०सी स्पार१९ या विमानानं नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाईट रडार २४ च्या माहितीनुसार, पेलोसी यांचं विमान आकाशातून जसं जसं तैवानच्या दिशेने जात होतं, तसं तसं या विमानाच्या प्रत्येक हालचालीवर एकाच वेळी ३,२०,००० युजर्स लक्ष ठेवून होते.

हेही वाचा: संजय पांडेंना १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी; उद्या जामिनावर सुनावणी

या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचाही यावर पाऊस पडला आहे. अनेकांनी म्हटलं की, डेमोक्रेटिक काँग्रेसच्या प्रतिनिधी नॅन्सी पेलोसी या सर्वाधिक वादग्रस्त भेटीवर यशस्वीरित्या पोहोचतील. तैवानच्या लिबर्टी टाईम्स या वृत्तपत्रानं म्हटलं होतं की, पेलोसी या स्थानिक प्रामाणवेळेनुसार रात्री १०.२० वाजता खासगी विमानानं तैपेईच्या सोंगशान विमानतळावर पोहोचतील, हे विमानतळ म्हणजे मिलिटरी बेस आहे. पण पेलोसी यांचं विमान रात्री साडे आठच्या सुमारासच विमानतळावर दाखल झालं.

हेही वाचा: देशात आता 'वन नेशन, वन गोल्ड रेट'? लवकरच सुरु होणार 'बुलियन्स एक्स्चेंज'

सध्याच्या घडामोडींनुसार,पेलोसी तैवानमध्ये गेल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला होता. तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वेबसाइटवर मंगळवारी सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर संकेतस्थळ काही काळासाठी बंद पडलं होतं.

Web Title: Plane Carrying Nancy Pelosi Becomes World Most Tracked Flight

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsusa
go to top