Plastic Waste : प्लास्टिक कचरा वाढतोय! दर मिनिटाला विकल्या जातात 1 दशलक्ष पाण्याच्या बाटल्या

तुम्ही घेत असलेल्या बाटलीचा पर्यावरणावर किती परिणाम याचा विचार केलाय का?
Plastic Waste
Plastic Waste esakal

Plastic Waste Is Increases : प्लास्टिक हा जगासाठी सर्वात मोठा धोका आहे. जगाला याची माहिती नाही असं ही काही नाही. पॅरिसमध्ये नुकतीच प्लास्टिक करारावर बैठक झाली, तरीही त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत.

उन्हाळ्यात घशाला कोरड पडली की जवळचे एखादे दुकान दिसते, पटकन पाण्याची बाटली उचलून आधी घसा थंड केला जातो. आणि संपलेली पाण्याची बाटली कचऱ्यात फेकून दिली जाते. पण त्या बाटलीचं पुढे काय होतं? कधी विचार केलाय का?

तुम्ही घेत असलेल्या बाटलीचा पर्यावरणावर किती परिणाम याचा विचार केलाय का? नॅशनल जिओग्राफीच्या एका अहवालानुसार प्लास्टिक हा जगातील सर्वात मोठा धोका आहे.

Plastic Waste
Plastic Bottle Germs : प्लास्टिकच्या बॉटलने पाणी का पिऊ नये? कारण वाचाल तर...

नॅशनल जिओग्राफीच्या या अहवालात असं सांगण्यात आलंय की जगात दर मिनिटाला 10 लाख पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या विकल्या जातात. यामध्ये पाणी, कोल्ड्रिंक, ज्यूस किंवा इतर पेयांचा समावेश आहे.

1950 मध्ये जगात 21 लाख टन प्लास्टिक वापरण्यात आले होते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2015 मध्ये हा आकडा 400 दशलक्ष टनांच्या पुढे गेला होता. सध्या ते सुमारे 500 दशलक्ष टन आहे.

Plastic Waste
Plastic Bottle : तीन हजार किलो प्लास्टिक बाटल्या जमा

विशेष म्हणजे या बाटल्यांमधून रिसायकल प्लास्टिकपैकी केवळ 40 टक्केच प्लास्टिक पुन्हा वापरलं जातं, त्यामुळेच जगभरात प्लास्टिकचा कचरा सातत्याने वाढत आहे.

जगभरातील देशांना याची माहिती नाही असंही नाही, या जागतिक समस्येचं निराकरण करण्यासाठी उपाय शोधले जात आहेत. याआधी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम अर्थात (UNEP) तर्फे प्लास्टिक करारावर एक बैठक झाली. महिना उलटला तरी 55 देशांमध्ये कोणताही ठोस निकाल मिळू शकला नाही.

Plastic Waste
Bottled Water Inspection : अन्न व औषध प्रशासनातर्फे बाटलीबंद पाण्याची तपासणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com