Bottled Water Inspection : अन्न व औषध प्रशासनातर्फे बाटलीबंद पाण्याची तपासणी

While inspecting bottled water at Shilapur, Food Safety Officer Go. Vs. Kasar
While inspecting bottled water at Shilapur, Food Safety Officer Go. Vs. Kasaresakal

Bottled Water Inspection : सध्याच्या उन्हाचा पारा वाढत असून जवळपास ४० अंशावर तापमान गेल्याने शीतपेये, फळे, आइस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट तसेच एनर्जी ड्रिंक्सच मोठया प्रमाणावर विक्री सुर आहे. तिची गुणवत्ता तपासणीची मोहीम अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेली आहे. (Inspection of bottled water by Food and Drug Administration nashik news)

त्याचाच भाग म्हणून शिलापूर (ता. नाशिक) येथे अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. कासार यांनी तपासणी करून विक्रीसाठी साठविलेल्या बाटलीबंद पाण्याच्या (अॅक्वा) ३००० बॉटल्स (३००० लिटर, किंमत साठ हजार) जप्त केल्या.

त्यांचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम संपूर्ण उन्हाळाभर सुरू राहणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खाद्य बर्फाला मोठी मागणी असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While inspecting bottled water at Shilapur, Food Safety Officer Go. Vs. Kasar
Nashik: पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाडे, घरांना नोटिसा; धोकादायक भाग उतरवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर

बर्फ उत्पादकाकडून वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची देखील नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या आदेशाने खाद्यबर्फ व अखाद्य बर्फ अशी वर्गवारी करण्यात आलेली असून अखाद्य बर्फासाठी निळा रंग वापरण्याचे बंधन आहे.

ही कारवाईसाठी श्री. कासार यांना नमुना सहाय्यक विजय पगारे यांनी मदत केली. सहाय्यक आयुक्त (अन्न) विवेक पाटील व सहआयुक्त संजय नारागुडे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांना अशुद्ध बर्फ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

While inspecting bottled water at Shilapur, Food Safety Officer Go. Vs. Kasar
350th Shivrajyabhishek Din : रायगडावर 6 जूनला 351 ध्वजाची सलामी! नाशिकच्या सिंहगर्जना मंडळाचा उपक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com