PM Modi Egypt tour
PM Modi Egypt tour

PM Modi Egypt tour: PM मोदी थेट अमेरिकेतून इजिप्तमध्ये दाखल! दोन्ही देशांमधील 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा

PM मोदींचा इजिप्तमधील हा पहिलाच अधिकृत राजकीय दौरा आहे.

कैरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचा तीन दिवसीय दौरा आटोपून थेट इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. इजिप्तची राजधानी कैरो इथल्या विमानतळावर त्यांचं आगमन झालं असून लष्करानं बँड वाजवून आपले पाहुणे असलेल्या PM मोदींचं जोरदार स्वागत केलं. (PM Modi arrives in Cairo on two day tour this is first visit of an Indian PM to Egypt since 1997)

PM मोदींचा इजिप्तमधील हा पहिलाच अधिकृत राजकीय दौरा असून या ठिकाणी दोन दिवस विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राजधानी कैरो इथं पंतप्रधानांचं विमान लँड झाल्यानंतर इजिप्तचे पंतप्रधान मोस्ताफा मॅडबॉली यांनी त्यांचं स्वागत केलं. मोदींचा हा पहिलाच अधिकृत दौरा असला तरी तब्बल २६ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पहिल्यांदा इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वी १९९७ मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी इजिप्तला भेट दिली होती.

दरम्यान, उद्या PM मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह आई सीसी यांची भेट घेणार आहेत. हेलिओपोलिस युद्ध स्मारक आणि अल हकीम मशीद इथं भेटीदरम्यान या दोन नेत्यांमध्ये अधिकृत चर्चा होणार आहे. तसेच कैरो इथं मोदींचं आगमन झाल्यानं तिथले अनिवासी भारतीय मोदींच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. महिलांनी साडीचा पारंपारिक पोषाख तर लहान मुलांनी देखील पारंपारिक पोषाख घालून मोदींच्या स्वागत कार्यक्रमात दाखल झाले आहेत.

भारतातील बोहरा मुस्लिम समाजाचं कैरोमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या काही समाज बांधवांनी रिट्झ कार्टन हॉटेलमध्ये भारताचा तिरंगा हातात घेऊन मोदींच्या स्वागतासाठी दाखल झाले. आज इजिप्तमधील ३०० ते ३५० भारतीय पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. त्यांना भेटीची आम्हाला प्रचंड उत्सुकता असल्याचं इजिप्तमधील भारतीय समाज संघटनेच्या अध्यक्षा दिप्ती सिंह यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com