भारताकडे पाकिस्तानसाठी योग्य रणनिती नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

लंडन : परदेश दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी आज लंडनमधील स्ट्रॅजिक स्टडीज इन्स्टिट्युमधील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. भारत परराष्ट्र धोरणांबाबत ही मागे पडताना दिसतो, तसेच आर्थिक प्रगतीच्या मुद्यावरून राहुल यांनी मोदींवर टीका केली. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाकिस्तानच्या राणनितीबाबत काही ठोस पावले अजूनही उचलता आलेली नाहीत. त्यामुळे पाकिस्तानसोबत काम करणे व संबंध प्रस्थापित करणे कठिण आहे, असे ते यावेळी म्हणाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या भक्कम असल्या तरी भरताच्या परराष्ट्र मंत्रालयात पंतप्रधान कार्यालयाची एकाधिकारशाही चालते. डोकलामच्या मुद्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले असते, तर आज चित्र वेगळे असले असते. डोकलाममध्ये चीनचा शिरकाव अजूनही आहे, पण त्याबाबत जास्त माहिती नसल्याने मी काही बोलणार नाही. 

मागील चार वर्षात भारताच्या सत्तेचे मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण झाले. नोटबंदीची मूळ संकल्पना ही आरएसएसची होती, पण त्याची अंमलबजावणी मोदी सरकारने केली. इतक्या वर्षांच्या सत्तेमुळे काँग्रेसमध्ये अहंकार निर्माण झाला होता, पण आता पक्ष त्यातून योग्य तो बोध घेत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi has no strategy on Pak says Rahul gandhi