
जेद्दा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी सौदी अरेबियामध्ये आगमन झाले. येथे ते युवराज महंमद बिन सलमान यांची भेट घेणार असून द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्यात चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदींचा हा सौदी अरेबियाचा तिसरा दौरा आहे.