गरिबीमुक्तीसाठी सरकार प्रयत्नशील- पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

भारतातील गरिबीमुक्तीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  फ्रान्स दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मोदींनी फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

पॅरिस : भारतातील गरिबीमुक्तीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  फ्रान्स दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी मोदींनी फ्रान्समधील भारतीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

फ्रान्सशी असलेली भारताची मैत्री ही अतूट आहे मागील पाच वर्षात भारतात सकारात्मक बदल झाले असून, मागील पाच वर्षात अनेक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या असल्याचेही पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

भारतातील घराणेशाही आता संपलेली असून भारतात झालेले बदल हे काही एकट्या मोदींनी केलेले बदल नाहीत; ही देशातील सर्व नागरिकांची ताकद आहे, यामुळेच देशात सकारात्मक बदल घडू शकले असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. जगातील  सर्वात मोठी आरोग्य योजना भारतात आहे; तसेच मुस्लिम महिलांसाठी ठोस पावले उचलत तीन तलाक कायदा करण्यात भारत सरकारला यश आल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi welcomed by Indian community in Paris