मोदी-जिनपिंग यांच्यात 'चाय पे चर्चा'

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

मोदी यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत ईस्ट लेक येथे वॉकसह नौका विहार केले. हआन हे चीनमधील प्रसिद्ध शहर आहे. मोदी प्रथमच मध्य चीनमध्ये गेले आहेत. जिनपिंग 2014 मध्ये भारत दौऱ्यावर आल्यानंतर यांच्यात चर्चा झाली होती.

हुआन : भारत आणि चीन या दोन्ही देशांतील सीमा भागात शांतता प्रस्थापित होण्यासाठी चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून आज (शनिवार) देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असून, आज त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चाय पे चर्चा केली आणि मॉर्निंग वॉकही केले.

मोदी यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत ईस्ट लेक येथे वॉकसह नौका विहार केले. हआन हे चीनमधील प्रसिद्ध शहर आहे. मोदी प्रथमच मध्य चीनमध्ये गेले आहेत. जिनपिंग 2014 मध्ये भारत दौऱ्यावर आल्यानंतर यांच्यात चर्चा झाली होती. आज या दोन्ही नेत्यांमध्ये चाय पे चर्चा झाल्यानंतर दहशतवादाची दोन्ही नेत्यांकडून निंदा करण्यात आली. 

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीनमधील संबंध दृढ होण्यासाठी पीपल-टू-पीपल संबंधांवर अधिक भर दिला जाणार आहे. भारत आणि चीन आपापल्या भाषांतील चित्रपट एकमेकांना दाखविणार आहेत. भारत आणि चीन हे दोन्ही देश एकत्र येऊन अफगणिस्तानमध्ये आर्थिक योजना सुरु करणार आहेत. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये गेल्या पाच वर्षांत वाढ झाली आहे. दोन्ही देशांतील वातावरण शांततामय राहण्यासाठी प्रयत्न केले जातील. सीमा भागात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi, Xi Jinping hold chai pe charcha, take boat ride in Wuhan’s East Lake