जिनपिंग-मोदी यांच्यात होणार २४ तासांत सहा बैठका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर असून, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आज (शुक्रवार) अनौपचारिक चर्चा करणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये 24 तासांमध्ये 6 बैठका होणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर असून, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आज (शुक्रवार) अनौपचारिक चर्चा करणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये 24 तासांमध्ये 6 बैठका होणार आहेत. या बैठकीदरम्यान ईस्ट लेकच्या नाववरही चर्चा केली जाणार आहे. याशिवाय अन्य महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. मोदी आणि जिनपिंग हे दोन्ही नेते द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी चर्चा करणार आहेत. 

पंतप्रधान मोदी यांच्या चीन भेटीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दुपारी पावणेएकच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला सुरवात होणार आहे. हुवई प्रोव्हिंसिअल म्युझिअममध्ये शी जिनपिंग पंतप्रधान मोदींचे स्वागत करतील. त्यानंतर शुक्रवारी रात्री ईस्ट गेस्ट हाऊसमध्ये जिनपिंग यांचा पाहुणचार करणार असून, त्यांच्यासोबत रात्रीचे जेवण करणार आहेत. तसेच हे दोन्ही नेते बोट रायडिंगही करणार आहेत. तत्पूर्वी ते दुपारचे जेवणही एकत्र करणार आहे. याशिवाय राष्ट्रपती जिनपिंग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत विविध मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi And Xi Jinping Will Hold 6 Meetings In Just 24 Hours