ट्रम्प यांच्याकडून PM मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव, भारत-चीन संघर्षावरही केलं भाष्य

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 September 2020

शुक्रवारी पुन्हा एकदा ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांच्या सोबतच्या मैत्रीचा दाखला दिल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर भारत-चीन संघर्षात मदत करण्याचे आश्वासनही ट्रम्प यांनी दिले आहे.  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. भारतीय अमेरिकन मते आपल्या बाजूने वळवण्यापासून ते सुरुवातीपासून प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते. शुक्रवारी पुन्हा एकदा ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांच्या सोबतच्या मैत्रीचा दाखला दिल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर भारत-चीन संघर्षात मदत करण्याचे आश्वासनही ट्रम्प यांनी दिले आहे.  

शांततेसाठी विश्‍वासाचे वातावरण आवश्‍यक; राजनाथसिंह यांचा चीनला टोला

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारतीय समुदायाला डोळ्यासमोर ठेवून ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. ते उत्तम काम करत आहेत. त्यांच्या रुपात भारतवासियांना एक महान नेता आणि व्यक्ती मिळाला आहे.   फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांनी पत्नी आणि अमेरिकन फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत दोन दिवसीय भारत दौरा केला होता. यावेळीच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. भारत हा एक अविश्वसनीय आणि मोठी ताकद असलेला  देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील झालेल्या हाउडी मोदी कार्यक्रमाचा दाखला देत त्यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. आम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे लोक आपल्याला मतदान करतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय.  

2500 वर्षांपूर्वीच्या ज्यू संस्कृतीचा शोध; समृद्ध इस्राईली राजवटीतले कोरीव दगड...

भारत-चीन संघर्षावरही केलं भाष्य 

भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण वातावरणाबाबतही ट्रम्प यांनी भाष्य केले. सध्याच्या घडीला दोन्ही देशातील स्थिती नाजूक आहे. हा तणाव कमी करण्यासाठी अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. दोन्ही देशांसोबत आम्ही चर्चा करत आहोत, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. चीनमधून आलेल्या व्हायरसमुळे जगातील 188 देश कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत, अशा शब्दांत त्यांनी चीनवर तोफ डागली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi is friend of mine says US President Donald Trump