पंतप्रधान मोदी स्वीडनमध्ये दाखल

वृत्तसंस्था
Tuesday, 17 April 2018

स्टॉकहोम : भारत-नॉर्वे शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री 9.30 वाजता स्वीडनमध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावर आहेत. 

स्वीडनचे पंतप्रधान स्टीव्हन लोफ्वेन यांनी मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. मोदी यांच्या आगमनानिमित्त एक भव्य सोहळाही आयोजित करण्यात आला होता. 

पंतप्रधान मोदी आज (मंगळवार) स्वीडनचे राजे सोळावे कार्ल गुस्ताफ यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान चर्चा करणार आहेत. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता दोन्ही नेते जाहीर निवेदन करणार आहेत. स्टॉकहोम विद्यापीठामध्ये पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात भाग घेणार आहेत. 

उद्या रात्री पंतप्रधान मोदी ब्रिटनकडे रवाना होतील. दोन दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी जर्मनीत चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi reaches Sweden for two day visit