आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत प्रत्यक्षात घडवणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi tribute to Dr BR Ambedkar on his death anniversary
PM Narendra Modi tribute to Dr BR Ambedkar on his death anniversary
Updated on

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना देशभरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा समावेश आहे. पुण्यतिथीचे औचित्य साधून देशात वेगवेगळे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहिली आहे.

1956 साली बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले. त्यावेळी देश शोकसागरात विलीन झाला होता. बाबासाहेबांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण याबद्दल व्यक्त केलेले विचार दिशादर्शक आहेत. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बोलताना मोदी म्हणाले, हा दिवस आपण नेहमीच स्मरणात ठेवायला हवा. त्यातून प्रेरणा घ्यावी. बाबासाहेबांनी सांगितलेले विचार हे कायम प्रेरणादायी आहेत. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्या विचारांची गरज आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब यांना जो भारत अपेक्षित होता तो निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. लक्षावधी नागरिकांच्या आयुष्यात जो प्रगतीचा नंदादीप तेवला आहे त्यामागे बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आहे. त्याचे त्यांनी अनुसरन करावे.

मोदींबरोबरच गृहमंत्री अमित शहा यांनीही बाबासाहेबांना भावांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले, दलितांच्या उत्कर्षासाठी लढणा-या बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरुन वाटचाल करत आहे. हे सरकार पूर्ण निष्ठेनं, समर्पित भावनेनं काम करत आहे. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या समस्यांपासून त्रासलेल्या वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम मोदी सरकारनं केलं आहे.

कॉग्रेसचे नेते राहूल गांधींनीही आंबेडकर यांना श्रध्दांजली वाहिली आहे. ते म्हणाले, भारत आता सर्व प्रकारच्या भेदभावापासून सत्याचा मार्ग अनुसरल्यामुळे दूर झाला आहे. देशाच्या उभारणीत आंबेडकरांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्याची आठवण करुन देणारा हा दिवस आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com