क्वाड परिषदेत जो बायडेन यांच्याकडून PM मोदींचे कौतुक; म्हणाले...| India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden

क्वाड परिषदेत जो बायडेन यांच्याकडून PM मोदींचे कौतुक; म्हणाले...

टोकियो : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे (US) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यात जपानमधील क्वाड (QUAD) बैठकीदरम्यान द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कोविड महामारीचा सामना लोकशाही पद्धतीने यशस्वीपणे हाताळल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. आपल्या कार्यकाळात अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध अधिक घट्ट आणि घनिष्ट व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचेही बायडेन म्हणाले. (PM Modi Joe Biden Meet IN Quad)

पंतप्रधान मोदींच्या यशाने जगाला दाखवून दिले आहे की, लोकशाही असलेले देश चीन आणि रशिया सारख्या निरंकुश देश वेगाने बदलणारे जग अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकते. कारण त्यांचे नेतृत्व दीर्घ लोकशाही प्रक्रियेतून न जाता निर्णय घेऊ शकतात आणि अंमलबजावणी करू शकतात. यावेळी पंतप्रधान मोदींनी बायडेन यांना तुम्हाला भेटून आनंद झाल्याचे सांगितले. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात विश्वासाचे नाते असून, व्यापाराव्यतिरिक्त दोन्ही देशांमधील संबंध प्रगतीपथावर असल्याचे म्हटले आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये समविचारी देशांना सोबत घेऊन जाऊ, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची आहे. आमचा समान हितावरील विश्वास दृढ झाला असून, आमची मैत्री मानव कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. (Quad Summit News)

हेही वाचा: संभाजीराजेंचा पत्ता कट? संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब

यूएस डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनसाठी भारतात काम सुरू ठेवण्यासाठी, लस उत्पादन, स्वच्छ ऊर्जा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी करार केला आहे आहे याचा मला आनंद होत असल्याचे बायडेन म्हणाले. आपल्या कार्यकाळात अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध अधिक घट्ट आणि घनिष्ट व्हावेत अशी आपली इच्छा आहे. यावेळी बायडेन यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा मुद्दाही उपस्थित करत पुतिन यांची भूमिका हा एक किंवा देशाचा मुद्दा नाही, तर ते संपूर्ण जगाचे संकट आहे.

भारत आणि अमेरिकेची भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. आमच्या सामायिक हितसंबंध आणि मूल्यांमुळे दोन्ही देशांमधील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले.

Web Title: Pm On India Us Ties After Bilateral Meet With Biden A Partnership Of Trust

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top