राजकीय पक्षांना कोर्टाचं समर्थन हवं असतं - सरन्यायाधीश

न्यायपालिका केवळ संविधान आणि संविधानाप्रती उत्तरदायी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
N. V. Ramana
N. V. Ramanaटिम ई सकाळ

नवी दिल्ली : सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी देशातील राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. कोर्टानं त्यांच्या भूमिकांचं समर्थन करावं असं राजकीय पक्षांना वाटतं, असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोत असोसिएशन ऑफ इंडो-अमेरिकन जनतेकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Political parties need support of the court the CJI Ramana slams)

सरन्यायाधीश रमणा म्हणाले, "भारतात सत्ताधारी पक्षाला वाटतं की, त्यांच्या प्रत्येक सरकारी कारवाईचं न्यायालयाकडून समर्थन व्हायला हवं. तसेच विरोधी पक्ष देखील कोर्टानं आपला राजकीय अजेंडा पुढे न्यावा अशी अपेक्षा करतात. पण न्यायपालिका ही फक्त संविधान आणि संविधानाप्रती उत्तरदायी आहे.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही लोक संविधानाने प्रत्येक संस्थांना दिलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्या समजू शकलेले नाहीत. आम्ही यावर्षी स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाचा सोहळा साजरा करत आहोत. तर आपलं प्रजासत्ताक ७२ वर्षांचं झालं आहे. त्यामुळं मला या गोष्टीची खंत वाटते की, जनतेकडून अद्याप संविधानानं आपल्यावर सोपवलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांच पूर्णपणे कौतुक होत नाही.

ग्रामीण जनतेचं केलं कौतुक

सरन्यायाधीशांनी भारताच्या ग्रामीण भागातील जनतेचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, आपल्या लोकांच्या सामुहिक बुद्धिमत्तेवर शंका घेण्याचं कारण नाही. महत्वाची गोष्ट ही आहे की, ग्रामीण भारतातील मतदार शहर, शिक्षण आणि संपन्नतेच्या तुलनेत अधिक सक्रिय आहेत.

समाजातील विविध भागातील लोकांचा सन्मान होणं गरजेचं

समाजातील विविध वर्गामध्ये विश्वास टिकवून ठेवण्यासाठी विविध पार्श्वभूमीच्या योग्य प्रतिभावंतांचा सन्मान करणं गरजेचं आहे, असं सांगताना सरन्यायाधीश म्हणाले, अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना सर्वसाधारण परिस्थितीतून अमेरिकेच्या निर्मितीत सक्रीय भूमिका निभावली आहे. त्यांनी केवळ आपली ओळखचं नव्हे तर या देशाचा चेहरा देखील बदलून टाकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com