Coronavirus : 'चीनच्या प्रयोगशाळेतूनच करोनाचा फैलाव झाल्याचे पुरावे'

Pompeo says significant evidence new coronavirus emerged from Chinese lab
Pompeo says significant evidence new coronavirus emerged from Chinese lab
Updated on

वॉशिंग्टन : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनच्या प्रयोगशाळेतूनच करोना व्हायरसचा फैलाव झाला असल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोनाच्या फैलावासाठी वारंवार चीनला दोषी ठरवत असून जाहीरपणे आरोप केले आहेत, अशात परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेकडे पुरावे असल्याचे म्हटले आहे. 

माइक पोम्पिओ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमेरिकेतील गुप्तचर विभागाच्या माहितीशी आपण असहमत असल्याचं सांगितलं आहे. ज्यामध्ये हा व्हायरस मानवनिर्मित किंवा विकसित करण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेक तज्ञांनी हा व्हायरस मानव निर्मित असल्याचं सांगितलं आहे. त्याच्यावर विश्वास न ठेवण्यासारखं कोणतंही कारण मला दिसत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. गुप्तचर विभागाची माहिती चुकीची असल्याची ते म्हणाले आहेत. व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचे सबळ पुरावे असल्याचं ते म्हणाले आहेत. मला वाटतं आता संपूर्ण जग सत्य पाहू शकतं. चीनने याआधीही जगाला असे अनेक आजार दिल्याचा आणि कमी दर्जाच्या प्रयोगशाळा सुरु केल्याचा इतिहास आहे, असं माइक पोम्पिओ यांनी सांगितलं आहे.

४ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं झालं अन्...

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प सतत चीनवर टीका करत असून माहिती लपवली असल्याचा आरोप केला आहे. सोबतच चीनला जबाबदार धरलं पाहिजे अशी मागणी केली आहे. कोरोनाने जगभरात अक्षरशः थैमान घातलं असून सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिका करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असूनदेखील अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com