esakal | पोप फ्रान्सिस यांनी बिकिनी मॉडेलचा फोटो लाइक केल्यानं खळबळ; मॉडेलनं दिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

pope like bikini model photo on instagram

कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी एका बिकिनी मॉडेलचा फोटो लाइक केल्यानं जगभरात उलट सुलट चर्चा रंगली आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या असून ज्या बिकिनी मॉडेलचा फोटो पोप फ्रान्सिस यांनी लाइक केला तिनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

पोप फ्रान्सिस यांनी बिकिनी मॉडेलचा फोटो लाइक केल्यानं खळबळ; मॉडेलनं दिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोम - कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी एका बिकिनी मॉडेलचा फोटो लाइक केल्यानं जगभरात उलट सुलट चर्चा रंगली आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या असून ज्या बिकिनी मॉडेलचा फोटो पोप फ्रान्सिस यांनी लाइक केला तिनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मॉडेल नतालिया गॅरिबोट्टो हिचा एक बोल्ड फोटो लाइक केल्यामुळे पोप फ्रान्सिस सध्या चर्चेत आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाइक केल्यानं ही चर्चा होत आहे. 

बारस्टूल स्पोर्ट्स नावाच्या सोशल मीडिया युजरने पोप फ्रान्सिस यांच्या अकाउंटवरून मॉडेलचा फोटो लाइक झाल्याचं समोर आणलं. याबाबत त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडल फ्रान्सिस्कस (Franciscus) वरून नतालिया गॅरीबोट्टोचा फोटो लाइक केला असल्याचं दिसतं. 

पोप फ्रान्सिस यांनी जो फोटो लाइक केला आहे त्यामध्ये नतालिया तोकड्या कपड्यांमध्ये दिसत आहे. एखाद्या कॅथलिक स्कूलच्या मुलीसारखी ती दिसत आहे. जेव्हा नतालियाला पोप फ्रान्सिस यांनी फोटो लाइक केल्याबद्दल विचारलं असता तिने मजेशीर अशी प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, आता कमीत कमी स्वर्गात तरी जरूर जाईन.

फ्रान्सिस यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो लाइकचा प्रकार अनावधानाने झाला की आणखी काही याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र पोप फ्रान्सिस यांनी लाइक केलेल्या फोटोला काही वेळातच अनलाइक करण्यात आलं. 

हे वाचा - धक्कादायक! UP मध्ये चिमुरडीवर बलात्कारानंतर जादुटोण्यासाठी काढली फुफ्फुसे

एखाद्या मॉडेलचा असा फोटो लाइक केल्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या लाइकची माहिती समोर आणणाऱ्या बारस्टूल स्पोर्टस् वर टीका केली जात आहे. तर अनेकांनी पोप हेसुद्धा आपल्यासारखेच असल्याचे म्हटले आहे. 

एका युजरने पोप यांच्यावर निशाणा साधताना हस्तमैथुनाची आठवण करून दिली. पोप फ्रान्सिस यांनी एक घोषणा केली होती. त्यात म्हटलं होतं की, आता हस्तमैथुन करणं हे पाप नाही. याचा एक फोटोही संबंधित युजरने शेअर केला आहे. 

loading image