मुक्काम पोस्ट कॅनडा, भारतीयांची वाढती पसंती

वृत्तसंस्था
रविवार, 14 जुलै 2019

कॅनडा सरकारनेही भारतीय नागरिकांसाठी 'एक्‍स्प्रेस एन्ट्री' योजनेद्वारे भारतीयांना कायमस्वरूपी निवासासाठी व्हिसा दिला आहे.

अमेरिका हे बहुतेक भारतीयांचे 'ड्रीम डेस्टिनेशन' आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी, नोकरीसाठी अमेरिकेत जाऊन तेथे स्थायिक होणाऱ्या भारतीयांची संख्याही मोठी आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'एच1 बी' व्हिसा व अन्य निर्णयांमुळे भारतीयांना तेथील व्हिसा मिळविण्यात अडचणी येत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे आता भारतीयांनी आता कॅनडाकडे लक्ष वळविले आहे. 

कॅनडा सरकारनेही भारतीय नागरिकांसाठी 'एक्‍स्प्रेस एन्ट्री' योजनेद्वारे भारतीयांना कायमस्वरूपी निवासासाठी व्हिसा दिला आहे. या योजनेनेनुसार 2018 मध्ये 39 हजार 500 भारतीयांना कॅनडात कायमस्वरूपी निवासासाठी परवानगी मिळाली आहे. 

कॅनडाची 'एक्‍स्प्रेस एन्ट्री' योजना (2018मधील आकडेवारी) 

स्थलांतरितांची एकूण संख्या  92,000 
स्थलांतरित भारतीय  39, 500 

(2017 मधील आकडेवारी) 

स्थलांतरितांची एकूण संख्या  65,500 
स्थलांतरित भारतीय  26,300 

2017 पेक्षा 2018 मधील वाढ 

एकूण स्थलांतरिताचे प्रमाण 41 टक्के
भारतीयांचे प्रमाण  51 टक्के 

कॅनडात कायमस्वरूपी निवास करण्यात अग्रस्थानी असलेले देश व तेथील नागरिकांची संख्या 
देश 2017 - 2018 वाढलेले प्रमाण (टक्केवारीत)

देश व तेथील नागरिकांची संख्या 2017-2018 वाढलेले प्रमाण टक्केवारी
भारत 26,331 39,667 51 
नायजेरिया 2,878 6,653 131
चीन 5,737 5,885 03 

2017 मध्ये कॅनडात कायमस्वरूपी निवास करणाऱ्यांमध्ये चिनी नागरिकांचा क्रमांक दुसरा होता. मात्र 2018 मध्ये चीनच्या 5 हजार 800 नागरिकांनीच कॅनडात कायमचे राहण्यास पसंती दिली. यामुळे चीनचा क्रमांक तिसऱ्या स्थानी घसरला तर नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर आला. 

'एक्‍स्प्रेस एन्ट्री' योजना 
कुशल आणि गुणवत्ताधारक लोकांना कॅनडात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी 'एक्‍स्प्रेस एन्ट्री'द्वारे प्रक्रिया करावी लागते. या योजनेद्वारे इच्छुकांचे ऑनलाइन प्रोफाइल तयार केले जाते. त्यांच्या 'सीआरएस'च्या गुणांनुसार प्रवेश गटात त्यांचा समावेश होतो.

'सीआरएस'मध्ये नोकरीचे पत्र, वय, शिक्षण आणि इंग्रजी व फ्रेंच या भाषेवर प्रभुत्व हे मुद्दे लक्षात घेतले जातात. जे अर्जदार 'कट ऑफ' गुणांपेक्षा अधिक गुण मिळवितात ते कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popularity of Indians for staying in Canada is increasing