
Volodymyr Zelenskyy
sakal
कीव्ह, ता. २ (एपी) : युक्रेनच्या वीजजाळ्यावर रशियाच्या सततच्या बॉम्बहल्ल्यांमुळे देशातील अणुविद्युत प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता वाढली आहे. ड्रोनने १९८६च्या चेर्नोबिल अणुदुर्घटनेच्या स्थळावरील वीजपुरवठा तीन तासांहून अधिक काळासाठी बंद पाडून युरोपमधील हा सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प वीजजाळ्यापासून तोडला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.