चीनला भूकंपाचे धक्के; जनजीवन विस्कळित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जून 2020

मध्य चीनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री १२ च्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती माध्यामांनी दिली आहे. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल एवढी होती.

बिजिंग : मध्य चीनमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री १२ च्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती माध्यामांनी दिली आहे. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल एवढी होती. चीनच्या माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार चीनमधील किघाई जवळील मेनयुआन काउंटी मध्ये जमीनीच्या आत १० किलोमीटर खोल भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भूकंपात जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही. मेनयुआन काउंटीत मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये एकच घबराट पसरली आणि गोंधळ निर्माण झाला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

झिंजियांग प्रांतात हा आज (ता. २६) शुक्रवारी सकाळच्या सुमारास भूकंप झाल्याचे जाणवले. दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. युतियान हे क्षेत्र भारताच्या जवळ असलं तर भूकंपाच्या धक्क्यांचा भारतावर कोणताही परिणाम जाणवला नाही.
----------------
...तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे; 'या' नेत्याने केली मागणी
----------------
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार
----------------
दरम्यान, यापूर्वी, मॅक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ७ पेक्षाही अधिक होती. या भूकंपात ५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आतापर्यंत मॅक्सिको आणि आसपासच्या परिसरात त्सुनामीचा धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भारतातही काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या महिन्यात दिल्लीव्यतिरिक्त अन्य ठिकाणीही अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. परंतु त्याची तीव्रता मात्र कमी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Powerful magnitude-6.4 earthquake hits China's Xinjiang

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: