

Delhi Police book Prashant Bhushan for allegedly sharing a manipulated video - AI Image
esakal
New Delhi: रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्जी लाव्हरोव्ह यांनी भारताबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करणारा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या व्हिडिओमध्ये एआयच्या मदतीने बदल करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केले होते. अल्ट न्यूज या फॅक्टचेक संकेतस्थळानेही या व्हिडिओची पडताळणी करून तो डीपफेक असल्याचे म्हटले आहे.