

New Criminal Law
ESakal
मुस्लिम राष्ट्र इंडोनेशियामध्ये २ जानेवारी रोजी एक नवीन गुन्हेगारी कायदा लागू होणार आहे. ज्यामुळे वादविवाद आणि चिंता दोन्ही निर्माण होतील. या नवीन कायद्यानुसार, विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि राष्ट्रपती किंवा सरकारी संस्थांचा अपमान करणे आता गुन्हा ठरेल. सरकारचे म्हणणे आहे की, हा कायदा देशाच्या संस्कृती आणि आधुनिक कायदेशीर गरजांनुसार बनवण्यात आला आहे, परंतु मानवाधिकार कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञांना त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे.