President Droupadi Murmu: औपचारिकरीत्या चित्त्यांचे हस्तांतर; राष्ट्रपती मुर्मू यांच्या बोत्स्वाना दौऱ्याची सांगता
President Draupadi Murmu Visits Botswana: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोत्स्वानामध्ये आठ चित्त्यांचे प्रतीकात्मक हस्तांतरण; दोन चित्त्यांचे विलगीकरण पिंजऱ्यात सोडण्यात आले. भारतात चित्त्यांची आगमन प्रक्रिया सुरू होणार आहे.
गॅबोरोन (बोत्स्वाना) : आफ्रिकी देश बोत्स्वानाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गुरुवारी बोत्स्वानाचे अध्यक्ष डुमा गिडियन बोको यांनी आठ चित्ते प्रतीकात्मकरीत्या हस्तांतरित केले.