
Jo Biden Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कॅन्सर ग्रासलं आहे. त्यातही प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झाल्यानं त्यांची प्रकृती ढासाळत चालली आहे. रविवारी बायडन यांच्या कार्यलयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. मुत्रविसर्जनात त्रास होत असल्यानं त्यांनी नुकतीच तपासणी करुन घेतली, या तपासणीत त्यांच्या आजाराबाबतची माहिती समोर आली आहे.