US Primary Election: जो बायडेन यांची विजयी सुरुवात; दक्षिण कॅरोलिनात मिळवला सहज विजय

President Joe Biden easily won South Carolina : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दक्षिण कॅरोलिनातील डेमोक्रेटची प्रायमरी निवडणूक सहज जिंकली आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षातर्फे ते प्रबळ उमेदवार असतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
President Joe Biden easily won South Carolina Democratic primary us election news
President Joe Biden easily won South Carolina Democratic primary us election news

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दक्षिण कॅरोलिनातील डेमोक्रेटची प्रायमरी निवडणूक सहज जिंकली आहे. त्यामुळे डेमोक्रेटिक पक्षातर्फे ते प्रबळ उमेदवार असतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गेली चार वर्षांतील बायडेन यांची कारकीर्द पाहता ती प्रभावी दिसली नाही. त्यामुळे डेमोक्रेटिक तर्फे त्यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित होत होते. ( President Joe Biden easily won South Carolina Democratic primary us election news)

बायडेन यांनी शनिवारी डेमोक्रेटमधील तीन नेत्यांना पराभव केला. बायडेन यांनी या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, '२०२० मध्ये दक्षिण कॅरोलिनाने अनेकांचा अंदाज खोटा ठरवत आमच्या कॅम्पेनमध्ये प्राण फुंकला होता. त्यानंतर आता २०२४ मध्ये देखील दक्षिण कॅरोलिना अध्यक्षपदापर्यंत मला घेऊन जाईल असा विश्वास आहे.' बायडेन यांनी यावेळी, डोनाल्ड ट्रम्प यांचा 'लूझर' असा असा उल्लेख केला.

President Joe Biden easily won South Carolina Democratic primary us election news
Donald Trump Defamation Case: निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना मोठा झटका! मानहानीच्या खटल्यात लेखिकेला ६९२ कोटी रुपये देण्याचे आदेश

असोसिएट प्रेसने बायडेन यांना रात्री ५ वाजून २३ मिनिटांना विजयी घोषित केले. बायडेन यांना सुरुवातीपासूनच आघाडी मिळाली होती. डेमोक्रेट पक्षाची पहिली प्रायमरी निवडणूक दक्षिण कॅरोलिनामध्ये पार पडली. राज्यात विविध समूदायाचे लोक राहतात. राज्यात कृष्णवर्णीयांची संख्या लक्षणीय आहे. दुसरीकडे, आयोवा आणि न्यू हॅम्पशायर राज्यांमध्ये गौरवर्णीय लोकांची संख्या जास्त आहे.

AP VoteCast च्या सर्वेनुसार, दक्षिण कॅरोलिना हा प्रामुख्याने रिपब्लिकनशी एकनिष्ठ आहे. पण, राज्यातील २६ टक्के जनता ही कृष्णवर्णीय आहे. २०२० च्या निवडणुकीमध्ये कृष्णवर्णीयांचा एकूण मतदानातील वाटा ११ टक्के होता. त्यातील ९ ते १० टक्के मतं बायडेन यांना पडली होती. त्यामुळे कृष्णवर्णीय समूदाय बायडेन यांच्या बाजूनेच असल्याचं सध्याच चित्र आहे.

President Joe Biden easily won South Carolina Democratic primary us election news
Donald Trump: पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्यास इस्रायलचा प्रश्न चुटकीशीर सोडवणार; ट्रम्प यांचं आश्वासन

दरम्यान, अमेरिकेत अध्यक्षपदाचा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहेत. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षातर्फे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. सध्या दोन्ही पक्षामध्ये आपला अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याच्या प्रायमरी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प हेच वरचढ ठरत असल्याचं दिसत आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com