Maldives: भारत सरकार मालदीवमधून सैन्य परत बोलावणार? अध्यक्ष मुइझु यांनी केलं जाहीर

भारताने मालदीवमधून सैन्य परत बोलावण्याची तयारी दाखवली असल्याचे मालदीवच्या अध्यक्षांनी जाहीर केलं आहे
Maldives
Maldives

नवी दिल्ली- भारताने मालदीवमधून सैन्य परत बोलावण्याची तयारी दाखवली असल्याचे मालदीवच्या अध्यक्षांनी जाहीर केलं आहे. सत्तेत आल्यानंतर अध्यक्ष मोहम्मद मुइझु यांनी भारतीय सैन्याला परत पाठवण्यात येईल असे आश्वासन जनतेला दिलं होतं. त्यानंतर शपथविधीनंतर त्यांनी भारत सरकारकडे याबाबतची औपचारिक विनंती केली होती. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय.(President of the Maldives announced on Sunday that India has agreed to withdraw its army from the Indian Ocean)

आमची आणि भारत सरकारची चर्चा झाली. यामध्ये भारत सरकारने आपल्या सैनिकांना परत बोलावण्याची मागणी मान्य केली आहे. तसेच विकास कामांच्या विषयी आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी एका उच्च स्तरीय समिती स्थापन केली जाईल, असं मुइझु मालेमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

Maldives
तनहा तनहा…यह कोई बात है; सोनाली कुलकर्णी Miss करतेय मालदीव ट्रीप

मालदीवच्या अध्यक्षांनी सैन्य माघारीची माहिती दिली असली, तरी भारत सरकारडून याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारमधील सूत्रांनी सांगितलं की, अद्याप काही निर्णय झालेला नाही. दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मुइझु यांच्यामध्ये COP29 हवामान परिषदेच्या दरम्यान सैन्य माघारीबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय.

मालदीवमध्ये भारतीय लष्कर आपात्कालीन मदतकार्यामध्ये गुंतलेलं आहे. भारतीय सैन्याची मालदीवमधील संख्या शंभराच्या आत आहे. सर्व सैनिक पायलट म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. मालदीवमध्ये समुद्री अपघातावेळी भारतीय लष्कराने अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, मालदीवमध्ये जवळपास १२०० बेट आहेत. यातील केवळ १०० बेटांवर मानवी वस्ती आहे. यातील काही बेट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

Maldives
Maldives Trip : स्वस्तात प्लॅन करा मालदीव ट्रीप

मुइझु हे चीनच्या जवळचे मानले जातात. चीन मालदीवमध्ये आपले हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक बेटं करार पद्धतीने भाड्याने घेतली आहेत. चीनचा प्रभाव वाढत असल्याने भारताची चिंता वाढली आहे. असे असले तरी मुइझु यांनी चीन आणि भारत या दोन्ही देशांना एकसमान वागणूक दिली जाईल, असं म्हटलं होते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com