पेट्रोलच्या दरात वाढ; नवे दर शंभरी पार

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

गव्हाच्या पीठाच्या दरातही वाढ

- कराचीत पेट्रोल दरवाढीचा भडका

इस्लामाबाद : महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यानंतर दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोलच्या किमतीही वाढल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

गेल्या 12 वर्षांतील सर्वात जास्त महागाई ही पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात झाली आहे. इंधनाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या कराचीत पेट्रोलचा दर हा प्रति लिटर तब्बल 200 रुपये झाला आहे. ही दरवाढ मार्केटिंग कंपनीची टर्मिनल बंद झाल्याने झाल्याचे सांगितले जात आहे. 

गव्हाच्या पीठाच्या दरातही वाढ

पाकिस्तानमधील कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथे गव्हाच्या पीठाचा दर 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे चपातीची किंमतीतही वाढ झाली आहे.

उद्धव ठाकरे आज दिल्लीत; महत्त्वाच्या नेत्यांची घेणार भेट

कराचीत पेट्रोल दरवाढीचा भडका

सिंध प्रांत आणि कराचीतील अनेक शहरात पेट्रोल दराचा भडका उडाला. या भागात इंधन पुरवठा काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्याने शहरातील नागरिकांना पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Petrol increased in Pakistan