शाळा सुरू करण्याबाबत पंतप्रधान बोरीस जॉन्सन आग्रही 

वृत्तसंस्था
Monday, 10 August 2020

शाळा पुन्हा सुरू करणे हा तर राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा आहे, असे नमूद करून जॉन्सन म्हणाले की, भविष्यातील स्थानिक लॉकडाउनमध्ये बंद केले जाणारे शाळा हे हॉटेल,पब  यांच्यानंतर सर्वांत शेवटचे ठिकाण असेल.

लंडन - ब्रिटनमधील शाळा सप्टेंबरमध्ये सुरू करण्याबाबत पंतप्रधान बोरीस  जॉन्सन आग्रही आहेत. सामाजिक, आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या हे अत्यावशक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

कोरोना साथीचा धोका कायम असला तरी शाळा सुरक्षितरित्या चालविणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी मेल या दैनिकातील स्तंभात व्यक्त केला. चाचणी आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासाची पद्धत सुधारली नाही तर हिवाळ्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असेल. ही लाट प्रारंभीच्या संसर्गाइतकीच मोठी असेल असा इशारा या महिन्याच्या प्रारंभीच अभ्यासानंतर देण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शाळा पुन्हा सुरू करणे हा तर राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा आहे, असे नमूद करून जॉन्सन म्हणाले की, भविष्यातील स्थानिक लॉकडाउनमध्ये बंद केले जाणारे शाळा हे हॉटेल, पब आणि दुकाने यांच्यानंतर सर्वांत शेवटचे ठिकाण असेल. शाळा बंद असतील तर जे पालक काम करू शकत नाहीत त्यांच्यावरील आर्थिक ताण कमालीचा वाढतो. मूले शिक्षणास मुकली तर देशाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे कुणालाच गाफील राहून चालणार नाही, असे जॉन्सन यांनी आवर्जून सांगितले. 

निःसंशयपणे जितकी गरज आहे त्यापेक्षा जास्त काळ शाळा बंद ठेवणे सामाजिकदृष्ट्या सहन होण्यासारखे नाही. आर्थिकदृष्ट्या ते टिकाव धरणारे नसेल, तर नैतिकदष्ट्या असमर्थनीय ठरेल. 
- बोरीस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Boris Johnson insists on starting schools