भारताशी युद्ध करायचे का?

पीटीआय
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पंतप्रधान इम्रान खान यांनी आज थेट तेथील संसदेमध्ये भारताविरोधात युद्ध छेडायचे का, अशी विचारणा केल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

इस्लामाबाद -  जम्मू आणि काश्‍मीरमधील ३७० वे कलम भारत सरकारने संपुष्टात आणल्यानंतर आता पाकिस्तानचा तीळपापड झाला असून पंतप्रधान इम्रान खान यांनी आज थेट तेथील संसदेमध्ये भारताविरोधात युद्ध छेडायचे का, अशी विचारणा केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. काश्‍मीरमधील विविध ठिकाणांवरील पोलिस ठाण्यांमध्ये शेकडो भारतीय सैनिक आणि पोलिस तैनात असून त्यांच्यावरच हल्ला करण्याची दर्पोक्ती इम्रान यांनी केली आहे.

पाकिस्तानच्या संसदेमध्ये काश्‍मीरमधील घडामोडींच्या अनुषंगाने आज विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते, पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ यांनी आज हा मुद्दा संसदेत उपस्थित करताना भारताला जशास तसे उत्तर द्यायला हवे असे मत मांडले. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) शरीफ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इम्रान यांचाही तोल ढळला. विरोधी पक्षांच्या नेत्यांना नेमके काय हवे आहे? मी पाकिस्तानी सैनिकांना भारतीयांवर हल्ला करण्याचा आदेश द्यायला हवा का ? अशी विचारणा त्यांनी या वेळी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Imran Khan today asked Do you want to war with India