esakal | बायडेन यांना मोदी म्हणतात; 'दृढ मैत्रीची बीजे रोवली गेली आहेत'
sakal

बोलून बातमी शोधा

बायडेन यांना मोदी म्हणतात; 'दृढ मैत्रीची बीजे रोवली गेली आहेत'

बायडेन यांना मोदी म्हणतात; 'दृढ मैत्रीची बीजे रोवली गेली आहेत'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन: पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत भेट झाली आहे. या भेटीसाठी पंतप्रधान मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी हिंदीत बोलत होते, तर दुभाषकाद्वारे त्यांनी बायडन यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे भरभरून स्वागत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. याआधी आम्हाला चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि त्यावेळी तुम्ही भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांची दृष्टी मांडली होती. आज, तुम्ही भारत-अमेरिका संबंधांसाठी तुमची दृष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेत आहात. पुढे ते म्हणाले की, आजची द्विपक्षीय शिखर परिषद महत्त्वाची आहे. आपण या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला भेटत आहोत. हे दशक कसे घडतंय त्यामध्ये तुमचे नेतृत्वाची नक्कीच महत्वाची भूमिका असेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत होण्यासाठी हे बीज पेरले जात आहे. तंत्रज्ञान एक प्रेरक शक्ती बनत आहे. मोठ्या जागतिक हितासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या प्रतिभेचा वापर करावा लागेल, असं त्यांनी म्हटलंय.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गांधीजींच्या जयंतीचा उल्लेख केला. गांधीजी विश्वस्तपणाबद्दल बोलले, एक संकल्पना जी येत्या काळात जगासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे, असंही मोदी म्हणाले. व्यापारामध्ये स्वतःचे असे एक महत्त्व भारताच्या आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये असणार आहे. या दशकात आपण एकमेकांना पूरक असू शकतो. अमेरिकेसोबत अनेक गोष्टी आहेत, ज्या भारताला आवश्यक आहेत आणि भारताबरोबर अनेक गोष्टी आहेत ज्या अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकतात. या दशकात व्यापार हे प्रमुख क्षेत्र असेल, असंही मोदी म्हणाले.

यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलंय की, माझा असा विश्वास आहे की अमेरिका-भारत संबंध आपल्याला अनेक जागतिक आव्हाने सोडवण्यात मदत करू शकतात. खरं तर 2006 मध्ये जेव्हा मी उपराष्ट्राध्यक्ष होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की 2020 पर्यंत भारत आणि अमेरिका जगातील सर्वात जवळच्या राष्ट्रांमध्ये असतील.

आज सकाळी मी द्विपक्षीय बैठकीसाठी व्हाईट हाऊसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहे. मी दोन्ही राष्ट्रांमधील सखोल संबंध दृढ करण्यासाठी उत्सुक आहे, एक मुक्त आणि खुले इंडो-पॅसिफिक संबंध कायम ठेवण्यासाठी काम करत आहे. - जो बायडेन

  • PM मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संध्याकाळी (भारतीय वेळेप्रमाणे) व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. गुरुवारी मोदींनी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली होती. द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच अफगाणिस्तान, हिंद-प्रशांत क्षेत्र आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली होती.

loading image
go to top