Modi Video : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना म्हणाले 'खरे बॉस', सिडनीमध्ये मोदींची आरती अन् जयघोष

Narendra Modi
Narendra Modiesakal

सिडनीः ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथील ऑलिम्पिक पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित केलं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांची यावेळी उपस्थिती होती. यापूर्वी सिडनीतल्या कुडोस बँक एरिनामध्ये वैदिक मंत्रोच्चारात आणि अन्य पारंपारिक विधींनुसार मोदींचं स्वागत करण्यात आलं.

सिडनीमध्ये पंतप्रधानांनी २० हजारांपेक्षा जास्त मूळ भारतवंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींच्या अगोदर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी मोदी खरे बॉस असल्याचं म्हटलं. त्याशिवाय ते म्हणाले की, या स्टेजवर मी यापूर्वी कुणाला बघितलं असेल तर ते ब्रूस स्प्रिंग्सटीन होते. त्यांना त्यावेळी एवढं प्रेम मिळालं नव्हतं. मात्र मोदींना जे प्रेम मिळतंय ते अभूतपूर्व आहे. यावेळी संपूर्ण स्टेडियम मोदी-मोदी घोषणांनी दणाणून गेलं होतं.

Narendra Modi
UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली

यावेळी बोलतांना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की, जर तुम्ही भारताला जाणून घेऊ इच्छिता तर तुम्हाला ट्रेन आणि बसने प्रवास करावा लागेल. एंथनी अल्बनीज पुढे म्हणाले की, जेव्हा मी मार्च महिन्यात भारतात होतो तेव्हा ती एक सुंदर आठवणींच्या क्षणांची यात्रा होती. गुजरातमध्ये होळी साजरी केली, दिल्लीमध्ये महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पित केली, मी जिथे जिथे गेलो तिथे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वेगळे नातेसंबंध बघायला मिळाले. जर तुम्ही खरंच भारताला समजून घेऊ इच्छिता तर तुम्ही ट्रेन आणि बसने प्रवास करा, असं एंथली म्हणाले.

Narendra Modi
PM Modi in Sydney: PM मोदी म्हणाले, 2014 मध्ये दिलेले वचन पूर्ण केले, मी...

ऑलिम्पिक पार्कमध्ये मोदींचं स्वागत पारंपारिक पद्धतीने केलं. तेथील स्थानिकांनी मोदींची आरतीही केली. यावेळी वैदिक मंत्रोच्चार पठण करण्यात आलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'नमस्ते ऑस्ट्रेलिया' अशी केली. एकूणच सभास्थळी मोदींच्या प्रभावाने वातारवण उल्हासित झालं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com