UPSC Result: युपीएससीचा निकाल जाहीर, पहिल्या चार क्रमांकावर मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली

पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे.
Ishita Koshore
Ishita Koshore

नवी दिल्ली : युपीएससी परीक्षा 2022चा निकाल जाहीर झाला असून पहिल्या चार रँकवर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये इशिता किशोर हीनं देशात पहिली रँक मिळवली आहे. दुसऱ्या रँकवर गरिमा लोहिया तर तिसऱ्या रँकवर उमा हारिथी एन. आहे.

युपीएससीच्या माहितीनुसार, या परीक्षेत ९३३ उमेदवार पात्र ठरले असून पहिल्या चारही स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे.

दरम्यान, या परीक्षेत ठाण्याच्या डॉ. कश्मिरा संखे यांनी महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. त्यांचा ऑल इंडिया रँक २५ आहे. तर रिचा कुलकर्णी हीनं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Ishita Koshore
UPSC Result: ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली; यशामागे किरण बेदींचा राहिला प्रभाव

कश्मिरा संखे यांनी निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "खूप काही अपेक्षा मी ठेवल्या नव्हत्या. पण आशा होती आणि सकारात्मकता ठेवली होती की यावेळी नक्कीच यश मिळवायचं आहे. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा फिलिंग होत होतं की, चांगला रँक येईल. तरी देखील ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे का रँकर लिस्ट आहे हे तपासून पाहिलं. पण ही रँकर लिस्ट असल्यानं त्यात माझा ऑल इंडिया २५ वा रँक आला"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com