ब्रिटिश राजघराण्याच्या प्रिन्सवर लैंगिक शोषणाचा आरोप; पदवी आणि संरक्षण केलं परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elizabeth II

ड्युक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांची लष्करी पदवी आणि राजघरणाचे संरक्षण संपुष्टात आले.

ब्रिटिश राजघराण्याच्या प्रिन्सवर लैंगिक शोषणाचा आरोप; पदवी आणि संरक्षण केलं परत

लंडन - ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यु (Prince Andrew) यांनी त्यांची लष्करी पदवी आणि राजघराण्याची सुरक्षा परत केली आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांनी आपले अधिकार परत केले असून याला महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांनी मंजुरी दिली आहे. ड्युक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांची लष्करी पदवी आणि राजघरणाचे संरक्षण संपुष्टात आले. आता अधिकृतपणे ते त्यांच्या नावासोबत हिज रॉयल हायनेससारखी पदवी वापरू शकणार नाहीत. प्रिन्स अँड्र्यू यांना वॉर हिरो ते प्लेबॉय प्रिन्स असंही ओळखलं जातं.

महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर ब्रिटिश राजघराण्याच्या गादीचा दावेदार म्हणून नवव्या स्थानावर प्रिन्स अँड्र्यूचे नाव होते. मात्र आता त्यांनी पदवी आणि संरक्षण परत केल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या राजघराण्यातील इतर सदस्यांकडे देण्यात येतील. तसंच ड्युक ऑफ यॉर्कला कोणतीही सार्वजनिक जबाबदारी दिली जाणार नाही, एका सामान्य नागरिकाप्रमाणेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्यांच्याविरोधातील खटला चालेल. त्यांच्याविरुद्ध व्हर्जिनिया रॉबर्ट्स गिफ्रे नावाच्या महिलेनं बळजबरीने लैंगिक संबंध ठेवल्याचा आऱोप केला आहे.

हेही वाचा: पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून काढले एव्हरेस्टचे छायाचित्र

अमेरिकेच्या एका न्यायालयाने प्रिन्स अँड्र्यु यांच्याविरोधात प्रकरणाची सुनावणी सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. व्हर्जिनिया रॉबर्ट्स गिफ्रे यांनी आरोप केला होता की, सेक्स ट्रॅफिकर आणि फायनान्सर जेफ्री एप्स्टिनच्या जाळ्यात ती अडकली होती. गिफ्रे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा प्रिन्स अँड्र्यू यांचे नाव घेतल्यानंतर खळबळ उडाली होती.

प्रिन्स अँड्र्युसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जेफरी एपस्टिनने तिला जाळ्यात ओढून पाठवलं होतं असा दावा व्हर्जिनिया रॉबर्ट्स गिफ्रे हिने केला आहे. कमी वयातच प्रिन्स अँड्र्यूसह त्यांच्या काही मित्रांसोबत यासाठी भाग पाडलं होतं असा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, प्रिन्स अँड्र्यू यांनी या आरोपांना आतापर्यंत फेटाळून लावलं आहे. १३ जानेवारीला प्रिन्स अँड्र्यु हे महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना एलिझाबेथ यांनीच त्यांच्या पदव्या आणि संरक्षण परत करावे लागेल, कोणतेही अधिकार राहणार नाहीत असं सांगितलं असल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top