ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स

ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी आरोग्य क्षेत्रात मोठी घोषणा केली आहे. मंगळवारी औपचारिकपणे त्यांनी या क्षेत्रात 1 अब्ज पौंड म्हणजेच 1.3 अब्ज डॉलर इतकी नव्याने गुंतवणूक केलीये. AstraZeneca संशोधन आणि विकास (R&D) सुविधेच्या माध्यमातून कंपनीने त्याच्या औषध निर्मितीला चालना देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

AstraZeneca ने ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित केलेल्या कोविड-19 लसीचे दोन अब्ज डोस पुरवले आहेत. कोविड-19 विरुद्ध प्रतिबंधात्मक अँटीबॉडी कॉकटेल बाजारात आणण्याचा विचारही करत आहे. परंतु कंपनी कोरोना व्हायरस साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर लस आणि थेरपीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार आहे. संशोधनाच्या इतर क्षेत्रांना देखील वाढवले ​​आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच AstraZeneca ने रोग तज्ञ एलेक्सियनची 39 अब्ज डॉलरची खरेदी पूर्ण केली.

हेही वाचा: खासगी क्रिप्टोकरन्सीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकार आणणार विधेयक

"आमचे केंब्रिजमधील नवीन डिस्कव्हरी सेंटरमध्ये रोग जीवशास्त्र समजून घेण्याची मदत होईल. तसेच यामुळे नवीन मर्यादा निश्चत होतील. एवढेच नाही तर रुग्णांसाठी जीवनावश्यक औषधे आणण्याची आणि कंपनीची क्षमता वाढण्यासही केंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडले, असे मुख्य कार्यकारी पास्कल सोरियट यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांवरील उपचारांचा मोठा पोर्टफोलिओ असलेल्या AstraZeneca ने म्हटलंय की, केंद्र जीन-एडिटिंग आणि सेल थेरपीसह विशेष औषधे आणि पुढील पिढीच्या उपचारांसाठी आवश्यक संशोधनास प्रोत्साहन देईल. ऑन्कोलॉजी रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या AstraZeneca चे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ सुसान गालब्रेथ यांनी सांगितले की, "पुढील तीन-चार वर्षांमध्ये क्लिनिकमध्ये उपचार घेण शक्य होईल. ज्यामुळे कर्करोगाच्या उपचारांच्या विविध पैलूंमध्ये प्रभावी नवीन औषधे उपलब्ध असेल."

loading image
go to top