भारतीय वंशाचे प्रीतम सिंह सिंगापूरचे विरोधी पक्षनेते

वृत्तसंस्था
Tuesday, 1 September 2020

भारतीय वंशाचे प्रीतम सिंह यांची सिंगापूर संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सिंगापूरच्या इतिहासात हे पद अधिकृतरित्या प्रथमच निवडण्यात आले. त्यामुळे त्यांची निवड ऐतिहासिक ठरली आहे.

सिंगापूर - भारतीय वंशाचे प्रीतम सिंह यांची सिंगापूर संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. सिंगापूरच्या इतिहासात हे पद अधिकृतरित्या प्रथमच निवडण्यात आले. त्यामुळे त्यांची निवड ऐतिहासिक ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रीतम हे वर्कर्स पार्टीचे नेते आहेत. 10 जुलै रोजी झालेल्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांच्या पक्षाला 93 पैकी 10 जागा मिळाल्या. विरोधी पक्षासाठी ही संख्या विक्रमी ठरली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रीतम हे 43 वर्षांचे आहेत. संसदेचे कामकाज सोमवारी सुरु झाल्यानंतर सभापती इंद्राणी राजा यांनी प्रीतम यांच्याबाबतची घोषणा केली. इंद्राणी या सुद्धा भारतीय वंशाच्या असून पीपल्स अॅक्शन पार्टीच्या नेत्या आहेत.

संसदेतील पहिल्या भाषणात प्रीतम यांनी सांगितले की, परदेशी नागरिक आणि त्यांच्या राहण्याची स्थिती याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परदेशी कामगारांचे व्यवस्थापन आणि त्यांना सामावून घेण्यास सुधारणा व्हायला हवी. सिंगापूरच्या आर्थिक संदर्भात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pritam Singh of Indian descent is the Leader of the Opposition party in Singapore