पेगॅसस बनवणाऱ्या कंपनीवर इस्रायल सरकारची छापेमारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेगॅसस बनवणाऱ्या कंपनीवर इस्रायल सरकारची छापेमारी

पेगॅसस बनवणाऱ्या कंपनीवर इस्रायल सरकारची छापेमारी

नवी दिल्ली : सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असणाऱ्या पेगॅसस (Pegasus) स्पायवेअरबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पेगॅसस स्पायवेअर बनवणारी कंपनी NSO वर आता इस्रायली सरकारने (Israel government) छापेमारी केली आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरण सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर समोर आलेली ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याबाबतचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलं आहे. (Project Pegasus Israel government raids NSO offices)

हेही वाचा: Pegasus row: "शशी थरुर हटाओ"; संसदीय समितीच्या सदस्यांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली सरकारी अधिकाऱ्यांनी NSO ग्रुपवर छापेमारी केली आहे. ही छापेमारी काल बुधवारी झाली आहे. NSO च्या प्रवक्त्यांनी याबाबत दुजोरा देत म्हटलंय की, इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यालयांना भेट दिली होती. पुढे त्यांनी म्हटलंय की, इस्रायली अधिकाऱ्यांसमवेत कंपनी पूर्ण पारदर्शकतेने काम करीत आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, अलीकडील मीडिया हल्ल्यांमध्ये आमच्यावर झालेल्या खोट्या आरोपांबद्दल कंपनीने वारंवार जाहीर केल्याप्रमाणे या तपासणीमधूनही वस्तुस्थिती समोर येईल.

हेही वाचा: चीनी कम्युनिस्ट पक्षाची शंभरी; कार्यक्रमात भारतातील डाव्या पक्षांची उपस्थिती

काय आहे पेगॅसस हेरगिरी प्रकरण?

पेगॅससच्या या प्रकरणात काही देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, प्रमुख राजकीय नेते, न्यायाधीश, अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा समावेश आहे. ‘ॲम्नेस्टी’ नावाच्या संस्थेनं हा खुलासा केलाय. यातच भारतातील काही लोकांचा समावेश आहे. ‘एनएसओ’ या पेगॅसस स्पायवेअरची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं ‘आम्ही हे सॉफ्टवेअर योग्य पडताळणी करून देशांच्या सरकारांना किंवा त्यांच्या संस्थांनाच विकतो,’ असं म्हटलंय. दुसरीकडे ‘न्यू यॉर्क टाइम्स’सारखं महत्त्वाचं वर्तमानपत्र आपल्या शोधपत्रकारितेतून म्हणतंय की, पेगॅसस भारतासह इतर सहा देशांना विकण्यात आलं आहे.

भारतात सध्या या हेरगिरी प्रकरणावरुन विरोधकांनी रान उठवलं आहे. या प्रकरणाची रितसर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेससहित सगळ्याच विरोधकांनी केली आहे. मोदी सरकारने पेगॅसस हे स्पायवेअर विकत घेतले आहे किंवा नाही? याचा खुलासा सरकारने करायला हवा, या मागणीसाठी विरोधक सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक असलेले दिसून आले आहेत.

loading image
go to top