
महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा कॅनडातील टोरांटोमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे
इस्लामाबाद- महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा कॅनडातील टोरांटोमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. करीम बलोच या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह आज टोरांटोतील हार्बरफ्रंट येथे सापडला.
बलोच यांनी २०१६मध्ये बलुचिस्तानातून बाहेर पडून कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. द बलोच नॅशनल मूव्हमेंटने करीमा यांच्या निधनाबद्दल ४० दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. जगातील सर्वांत प्रभावशाली १०० महिलांच्या २०१६च्या यादीत ‘बीबीसी’ने बलोच यांच्या नावाचा समावेश होता. संयुक्त राष्ट्रांमध्येही त्यांनी पाकिस्तानातील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते.
जानेवारीत होणाऱ्या CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत केंद्राचा मोठा निर्णय
करीमा बलूच यांचा मृत्यू अशाप्रकारचा पहिला नाही. यापूर्वी बलूच पत्रकार साजिद हूसैन यांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. पाकिस्तान करीमा बलूच यांना रॉ एजेंट मानायचा. बलूचिस्तान हा पाकिस्तानमधील संसाधनांनी भरपूर असा प्रदेश आहे, पण पाकिस्तानने या भागाला नेहमीच उपरेपणाची वागणूक दिली आहे. गेल्या 15 वर्षात बलूचिस्तानमधील विद्रोहाला वेग आला आहे. पाकिस्तानी लष्कराने या भागात दडपशाही चालवली आहे. अनेक बलूच नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.
करीमा बलोच बलूचिस्तान विद्यार्थी संघटनेच्या चेअर पर्सन राहिल्या आहेत. अनेक महिला त्यांच्याकडे आशेने पाहायच्या. महिलांवरील अत्याचारांविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. तसेच बलूचिस्तानमध्ये होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा त्यांनी आतरराष्ट्रीय पातळीवर नेला होता.
...तर भाजप नेत्यांनी आपलं पद सोडावं; पीकेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
रक्षाबंधनच्या दिवशी करीमा बलूच यांनी ट्विट करत मोदींना साद घातली होती. बलूच बहिणींचे भाऊ गायब होत आहेत, त्या आपल्या भावाची वाट पाहात आहे. या लढाईत त्यांना साथ देणाऱ्या हमाल हैदर यांच्यासोबत त्यांनी लग्न केले होते. त्यांनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायमच पाकिस्तानच्या नजरेत त्या विलन राहिल्या आहेत.