
अमेरिकेच्या संसदेमध्ये महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग ज्यूनिअर यांचे कार्य आणि विचारांना चालना देण्यासाठी कायदा करण्यात आला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या संसदेमध्ये महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग ज्यूनिअर यांचे कार्य आणि विचारांना चालना देण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे भारत आणि अमेरिकमध्ये द्विपक्षीय कार्यक्रमांची देवाण-घेवाण वाढणार आहे. या कायद्याच्या मसुद्याला मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी संसद सदस्य जॉन लेविस यांनी तयार केले होते. ज्यांचे याच वर्षी निधन झाले आहे.
भारतीय वंशाच्या संसद सदस्य डॉ. एमी बेरा यांनी या विधेयकाचे समर्थन केले होते. या कायद्यामुळे अमेरिका-भारत पब्लिक प्रायवेट डेव्हलपमेंट फाऊंडेशनची स्थापना केली जाईल. याअंतर्गत महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग ज्यूनिअर यांच्या अहिंसक विरोधाच्या सिद्धांताचा अभ्यास आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. संसदेच्या विदेश प्रकरणाच्या समितीचे अध्यक्ष एलियट इंगेल म्हणाले की, या कायद्यानंतर दोन्ही देश गांधी आणि लूथर किंगच्या सिद्धांतांचे अध्ययन आणि हवामान बदल, शिक्षण आणि लोकांचे आरोग्य यासारख्या मुद्यांवर एकत्र येऊन काम करण्यात येईल.
जाणून घ्या नेव्हीचा इतिहास आणि नव्ही डे साजरा करण्यामागचे कारण...
बेरा म्हणाल्या की, जगभरातील सर्वात जून्या आणि सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या रुपात अमेरिका आणि भारतामध्ये सध्याचे मुल्य टिकवून ठेवण्याची पंरपरा जूनी आहे. महात्मा गांधी, किंग ज्यूनिअर आणि अमेरिकी संसद सदस्य लेविस यांच्यासारख्या महान व्यक्तीने या मुल्यांना चालना दिली आहे. हा कायदा त्यांचे मुल्य आणि विचारांना सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करील. तसेच त्यांच्या पावलावर चालण्याची प्रेरणा देत राहिल. कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे की, आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकेची एजेंसी यूएसएआयडी विदेश मंत्रालयातसोबत मिळून भारत सरकारच्या मदतीने अमेरिका-भारत 'गांधी-किंग डेव्हलपमेंट फाऊंडेशनची' स्थापना केली जाईल.
कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे की विदेश मंत्रालय भारत सरकाच्या सहयोगाने 'गांधी-किंग स्कॉलर्ली एक्सचेंज इनेशिएटिव्ह' कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल. यामुळे अमेरिका आणि भारतातील शोधकर्त्यांना वार्षिक शैक्षणिक मंच उपलब्ध करुन दिला जाईल. या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक न्याय आणि मानवता व नागरिक अधिकारावर महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग ज्यूनिअर यांच्या विचारांवर लक्ष केंद्रीत करण्याचा असेल. याअंतर्गत 2025 पर्यंत दरवर्षी 10 लाख अमेरिकी डॉलर अनुदानाची तरतूद आहे. दरम्यान, लेविस यांनी 2009 मध्ये भारताचा दौरा केला होता आणि मार्टिन लूथर किंग यांच्या आठवणीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता.