जाणून घ्या नेव्हीचा इतिहास आणि नव्ही डे साजरा करण्यामागचे कारण...

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 4 December 2020

1934 मध्ये ब्रिटीशांनी 'रॉयल इंडियन नेव्ही' (आरआयएन) या सेनेपासून नौदलाची सुरुात केली. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर 'नौदल दिन'' म्हणून साजरा करण्यात येतो.

आजचा दिवस हा  भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1971 मध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात मिळवलेले यश आणि पूर्व पाकिस्तान नेव्हीचे उच्चाटन करण्यात बजावलेली महत्त्वपूर्ण कामगिरी याच्या स्मरनार्थ 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. भारताने पाकिस्तान विरुद्धची मोहिम आखली होती त्याला ऑपरेशन ट्रायडंट असे नाव देण्यात आले होते. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. त्यामुळे नेव्हीच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नेव्ही डे साजरा केला जातो.  

भारतीय नौदलाची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच सक्षम आहे. कान्हाजी आंग्रे यांचे नौदलामध्ये मोठे योगदान असल्याची उदाहरणे इतिहासात वाचायला मिळतात. त्यामुळेच आयएनएस या नावाने नौदलाची ओळख ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांनी समुद्रामार्गाचे महत्त्व जाणून समुद्र मार्गावर सुरक्षेवर करडी नजर ठेऊन शत्रूला रोखण्याचे काम केले. भारताच्या भौगोलिक रचनेनुसार, देशातील नऊ राज्ये ही समुद्र किनाऱ्याला लागून आहेत. जगातील जवळपास 80 टक्के व्यापार हा हिंदी महासागरातून होते. त्यामुळे नौदलावर संरक्षणाची मोठी जबाबदारी आहे.  

Operation Trident: पाकिस्तानला घरात घुसून मारलं त्याची आठवण करून देणारा 'आजचा दिवस'

1934 मध्ये ब्रिटीशांनी 'रॉयल इंडियन नेव्ही' (आरआयएन) या सेनेपासून नौदलाची सुरुात केली. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर 'नौदल दिन'' म्हणून साजरा करण्यात येतो.

भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाचे आहे. जगातील सर्वोत्तम नौदलामध्ये भारतीय नौसेना पाचव्या क्रमांकावर आहे.  नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. तर भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाची ताकद वाढवतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You Know What is the history of Navy Day