
सिडनी : युरोपप्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्येही स्थलांतरितांविरोधातील रोष वाढत चालला असल्याची लक्षणे दिसू लागली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी (ता. ३१ ऑगस्ट) झालेल्या देशव्यापी आंदोलनांचे लक्ष्य भारतीय स्थलांतरित होते. तेथील सरकारने याचा निषेध केला असला तरीही स्थानिकांमध्ये परदेशी नागरिकांविरोधातील असंतोष वाढतच आहे.