वृत्तवाहिनीवरील लाईव्ह चर्चेतच 'फ्री स्टाईल' (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

पाकिस्तानच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे ज्येष्ठ नेते मसुर अली सिअल यांनी कराची प्रेस क्लब अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार इम्तियाज खान फरान यांच्यावर हल्ला केला. हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफताब मुघेरी यांच्या शो दरम्यान हा सर्व प्रकार घडला.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीवरील लाईव्ह चर्चासत्रात दोन वक्त्यांमध्ये थेट हाणामारी झाल्याची झाल्याची घटना घडली. 

पाकिस्तानच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे ज्येष्ठ नेते मसुर अली सिअल यांनी कराची प्रेस क्लब अध्यक्ष आणि वरिष्ठ पत्रकार इम्तियाज खान फरान यांच्यावर हल्ला केला. हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफताब मुघेरी यांच्या शो दरम्यान हा सर्व प्रकार घडला. वरिष्ठ पत्रकार ज्या पद्धतीने प्रतिवाद करत होता ते तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या प्रवक्त्याला रुचले नाही. त्यामुळे त्याने थेट मारहाणीला सुरुवात केली. 

चर्चासत्रातील इतर पाहुण्यांनी आणि सूत्र संचालकांनी या दोघांना वेगळे केले.  या घटनेनंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह तेहरिक-ए-इन्साफ पक्षावर टीका करण्यात येत आहे. कराची प्रेसक्लब अध्यक्ष इम्तियाज खान फरान यांच्यावर लाईव्ह कार्यक्रमात हल्ला करण्यात आला. हा नवा पाकिस्तान आहे का? असे मत पाकिस्तानमधील मुक्त पत्रकार नालया इनायत यांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PTIs Masroor Ali Siyal attacks president Karachi press club Imtiaz Khan on live news show