
पुलित्झर पुरस्काराची घोषणा: भारतातील पत्रकारांचा समावेश; पाहा यादी
वॉशिंग्टन : पुलित्झर पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये भारतातील काही पत्रकारांची नावे आहेत. पत्रकारिता, पुस्तके, नाटक, संगीत या क्षेत्रातील पुलित्झर पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून भारताच्या अदनान आबिदी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांच्याबरोबरच विजेत्यांमध्ये वॉशिंग्टन पोस्ट, भारताचे अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू, अमित दवे, दिवंगत दानिश सिद्दीकी यांचा समावेश आहे. युक्रेनच्या पत्रकारांनाही यावेळी पुलित्झर पुरस्कारात स्थान देण्यात आले आहे. रॉयटर्सचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच अदनान अबिदी, सना इर्शाद आणि अमित दवे यांना भारतातील कोरोनाच्या काळात छायाचित्रांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. सिद्दीकीचा गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
पुलित्झर पुरस्कार जाहीर झालेल्यांची यादी.
पब्लिक सर्विस - वॉशिंगटन पोस्ट
ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग - मायामी हेराल्ड
इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग - कोरी जी जॉनसन, रेबेका विलंगटन, एली मरे एक्सप्लेनेटरी रिपोर्टिंग - क्वांटा मैजजीन
लोकल रिपोर्टिंग - मैडिसन हॉपकिंस, सिसिलिया रेयेस
नेशनल रिपोर्टिंग - न्यूयॉर्क टाइम्स
इंटरनेशनल रिपोर्टिग - न्यूयॉर्क टाइम्स
फीचर राइटिंग - जेनिफर सीनियर
कमेंट्री - मेलिंडा हेनबर्गर
क्रिटिसिज्म - सलामिशाह टिलेट
एडिटोरियल राइटिंग - लिहा फॉकेनबर्ग, माइकल लिंडेनबर्ग, जो होले, लुईस करास्को
इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग एंड कमेंट्री - फहमीदा आजिम, एंथी डेल, जोश एडम्स, वाल्क हिके
ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी - मार्कस यम, विन मैकनेमी, ड्रू एंगरर, स्पेंसर प्लैट, सैमुएल कोरम, जॉन चेरी
फीचर फोटोग्राफी - अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू, अमित दवे, दानिश सिद्दिकी
ऑडियो रिपोर्टिंग - फ्यूचूरो मीडिया एंड पीआरएक्स
फिक्शन - द नटानियास
ड्रामा - फैट हैम, इतिहास कवर्ड विद नाइट
बायोग्राफी - चेजिंग मी टू माइ ग्रेव
कविता - फ्रैंक:सोनेट
जनरल नॉनफिक्शन - इंविन्सिबल चाइल्ड
संगीत - वाइसलेस मास
Web Title: Pulitzer Award Announce India Photo Journalist Adnan Abidi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..