esakal | कॅलिफॉर्नियातील विमान अपघातात मूळ पुणेकर असलेल्या डॉक्टरचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

California Plane Crash

कॅलिफॉर्नियातील विमान अपघातात मूळ पुणेकर असलेल्या डॉक्टरचा मृत्यू

sakal_logo
By
सुधीर काकडे

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आज एका डबल इंजिन विमानाला अपघात होऊन ते कोसळले. भारतीय वंशाच्या कार्डिओलॉजिस्टच्या मालकीचे असलेल्या या विमान अपघातात डॉक्टरांसह दोन जण ठार झाले. हे विमान कोसळलेल्यामुळे जवळपासच्या घरांना आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरिझोना येथील युमा रिजनल मेडिकल सेंटर (YRMC) मध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉ. सुगाता दास यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यावेळी दास हे विमान चालवत होते की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हेही वाचा: पाकिस्तान विमान अपघात : पायलटने मदतीसाठी साधला होता संपर्क

वायआरएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी भरत मगू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “स्थानिक हृदयरोगतज्ज्ञ सुगाता दास यांच्या मालकीच्या विमानाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले आहे. ते एक मोठा वारसा सोडून गेले आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंब, सहकारी आणि मित्रांच्या या दु:खात आम्ही सहभागी आहोत."

सँटी येथील सँटाना हायस्कूलजवळ झालेल्या अपघातामुळे दोन घरे जळाली असून, काही वाहनांचं देखील नुकसान झाले. इतर घरांमध्ये पसरण्यापूर्वी अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मरण पावलेली आणखी एक व्यक्ती यूपीएस कामगार होती अशी माहिती मिळाली आहे.

loading image
go to top