ट्रम्प यांनी रशियाला पाहुणे म्हणून यावे : पुतीन

यूएनआय
रविवार, 29 जुलै 2018

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाहुणे म्हणून रशियात यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, पुतीन यांच्या इच्छेचे अमेरिकेने स्वागत केले आहे. ब्रिक्‍स परिषदेत सहभाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत असलेले पुतीन यांनी उभय देशांत द्विपक्षीय चर्चा होण्यासाठी पोषक वातावरणाची गरज असल्याचे नमूद केले. गेल्या आठवड्यात उभय नेत्यांची हेलसिंकी परिषदेनिमित्त भेट झाली होती. या भेटीनंतर अमेरिकी राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. 

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाहुणे म्हणून रशियात यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, पुतीन यांच्या इच्छेचे अमेरिकेने स्वागत केले आहे. ब्रिक्‍स परिषदेत सहभाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत असलेले पुतीन यांनी उभय देशांत द्विपक्षीय चर्चा होण्यासाठी पोषक वातावरणाची गरज असल्याचे नमूद केले. गेल्या आठवड्यात उभय नेत्यांची हेलसिंकी परिषदेनिमित्त भेट झाली होती. या भेटीनंतर अमेरिकी राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. 

पुतीन यांची भेट होण्यापूर्वी ट्रम्प यांनी द्विपक्षीय चर्चेबाबत ट्रम्प यांनी उत्सुकता व्यक्त केली होती. शीतयुद्ध समाप्तीनंतर रशियाशी फारसे चांगले संबंध राहिलेले नसल्याने दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशातील संबंध अधिक चांगले निर्माण व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. व्हाइट हाउसच्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स म्हणाल्या, रशियाचे अध्यक्ष पुतीन वॉशिंग्टनला येण्याची आशा आहे आणि औपचारिक निमंत्रण मिळाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांना मॉस्कोला जाण्याचे दरवाजे खुले राहतील. 2016 मध्ये अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपासंदर्भात ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासमोर आपली बाजू भक्कमपणे न मांडल्याने ते आपल्याच नेत्याच्या टीकेचे धनी बनले होते. हेलसिंकी परिषदेनंतर अमेरिकी नेत्यांनी ट्रम्पपेक्षा पुतीन सक्षम असल्याचे म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Putin says Trump can be my guest in Moscow White House welcomes