Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?
रशियाचे विमान अलास्कात उतरले तेव्हा त्यांना इंधन भरायचे होते. पण अमेरिकेची बँकिंग प्रणालीचा वापर करण्याची परवानगी त्यांना नसल्याने रोख पैसे द्यावे लागले.
वॉशिंग्टनः रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्का येथे गेल्या आठवड्यात चर्चा झाली. यानंतर तेथून परतताना तीन विमानात इंधन भरण्यासाठी पुतीन यांना अडीच लाख डॉलर (२.२ कोटी रुपये) रोखीने द्यावे लागले.