
Russian Young Army: युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला 11 दिवस उलटले आहेत. नाटोमध्ये सामील होण्याच्या युक्रेनच्या विचारामुळे रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या म्हणण्यानुसार युक्रेन त्यांच्या अटी मान्य करेल तेव्हाच ते युद्ध थांबवतील. दरम्यान, रशियन चिल्ड्रेन आर्मीबद्दल पाश्चात्य मीडियामध्येही बातम्या येत आहेत, ज्यांचे कारनामे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे एक मजबूत फ्रंटलाइन आर्मी तर आहेच, पण त्यांच्या देशात आणखी एक धोकादायक आर्मी तयार केली जात आहे. ही सेना मुलांची (Children Army) आहे, पण ही मुले थेट मृत्यूचे दूत होत आहेत. येथे वयाच्या 8 व्या वर्षापासून त्यांना मशीन गन चालवण्याचे आणि ग्रेनेड वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. (Putin's 'child army' more dangerous than Russian army! 8 year old run machine guns)
'बालसेना' खूप धोकादायक आहे-
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, यंग आर्मी नावाच्या या सैन्यात सहभागी झालेल्या मुलांचे वय 8 ते 18 वर्षांच्या दरम्यान आहे. त्यांचे वय लहान असू शकते, परंतु त्यांचे कारनामे मात्र खतरनाक आहेत. AK47 रायफल, मशीनगन, हँड ग्रेनेड यांसारख्या गोष्टी युद्धामध्ये (War) कशा वापरायच्या हे त्यांना माहीत आहे. कोणतीही कामे ते चुटकीसरशी करू शकतील, असे प्रशिक्षण त्यांना दिलं जात आहे. रशियन चिल्ड्रेन आर्मीची निर्मिती व्लादिमीर पुतिन यांनी 2015 मध्ये केली होती. अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून धोका लक्षात घेऊन यंग आर्मीची स्थापना करण्यात आली. ऑल-रशिया यंग आर्मी नॅशनल मिलिटरी पॅट्रिओटिक सोशल मूव्हमेंट असोसिएशन असं या यंग आर्मीचं नाव आहे.
शाळकरी मुलीही सैन्याचा भाग आहेत-
या सैन्यात प्रामुख्याने शाळकरी मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालसेनेत 10 लाखांहून अधिक मुलांचा सहभाग आहे. आपल्या देशासाठी जीवही देऊ शकणाऱ्या या सैन्यात मुला-मुलींचा समान सहभाग असतो आणि त्यांनाही त्याच पद्धतीने लष्करी प्रशिक्षण दिले जाते. रशियाने याला स्वसंरक्षणाची पद्धत असे म्हटलं आहे, तर पाश्चिमात्य देश याला हिटलरचे तरूण असे संबोधून टीका करतात. या मुलांना शस्त्रे कशी हाताळायची, चालवायची, कुस्ती आणि पॅराशूट जंपिंग कसे करायचे हे माहीत आहे. या मुलांना परदेशी भाषांचे प्रशिक्षणही मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.