
नवी दिल्लीः गेल्या तीन वर्षांपासून पाश्चिमात्य देश युक्रेन युद्धाच्या विरोधात रशियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, रशिया आपल्या ४ शक्तिशाली मित्रांमुळे सर्व पाश्चिमात्य निर्बंधांचा सामना करत आहे. हा फायदा एकतर्फी नाही; युरोपियन देशांपासून रशियाच्या दूर जाण्याचा त्याच्या मित्रांनाही मोठा फायदा मिळत आहे, जे रशियाकडून स्वस्त दरात तेल आणि इतर वस्तू घेत आहेत.